E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मेट्रोच्या ढिसाळ कारभारामुळे पादचार्यांच्या जीवाला धोका
Wrutuja pandharpure
16 May 2025
पुणे
: शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी मेट्रो सेवा सुरु करण्यात आली आहे. या मेट्रोसाठी उभारण्याती आलेल्या पुलांच्या खांबावर जाहिरात फलक लावून उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट मेट्रोने ठेवले आहे. परंतु दुसरीकडे या उत्पन्नाच्या नादाचा नागरिकांचा जीव धोक्यात घातल्याचा प्रकार समोर आला आहे. जाहिरात फलकाला वीज जोडणीसाठी टाकण्यात आलेल्या केबल्य भूमिगत करणे अपेक्षित आहेत परतूं त्या उघड्यावर टाकण्यात आल्या आहेत. मेट्रोच्या ढिसाळ कारभारामुळे पादचार्यांचा जीवाल धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे जाळे निर्माण केले जात आहे. अनेक भागात मेट्रो सेवा देखिल सुरु झाली आहे. मेट्रो जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या पुलांच्या खांबावर जाहिरात फलक उभारण्याची परवानगी मेट्रोने दिली आहे. मेट्रोने जाहिरातीचे निवेदा काढून ते खासगी ठेकेदाराला देण्यात आले आहे. जाहिरात फलकासाठी लावण्यात आलेल्या फलकामध्ये वीज पुरवठा करण्यासाठी विद्युत केबल्स टाकण्यात आली आहे. ही केबल मेट्रोने भूमिगत करणे अपेक्षित आहे. परंतु, नगर रस्त्यावर पुणेमेट्रोने रामवाडी मधील पादचारी मार्गात विद्युत केबल टाकल्याचा प्रकार समोर आला आहे.
टाकण्यात आलेली केबल ही हायटेंशन केबल असल्याचे दिसून येत आहे. या केबलमधून उच्च दाबाने विद्युत पुरवठा केला जातो. काही वेळा शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. त्यामुळे रस्ता ओलाडताना जर भविष्यात ही केबल जळाली किंवा शॉर्ट सर्किट झाली तर एखाद्या पादचार्याचा जीव जाण्याचा धोका आहे. त्यामुळे मेट्रोन तात्काळ ही केबल काढून घ्यावी किंवा भूमिगत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ही केबल उघड्यावर असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. रामवाडीमध्ये दोन पुणे महापालिकेच्या शाळा आहेत. तर नगररोड (वडगावशेरी) क्षेत्रिय कार्यालय, विविध प्रकारचे दवाखाने, बँका व विविध कार्यालय आहेत. त्यामुळे कामानिमित्त व विद्यार्थ्यांना शाळेत सोडवण्यासाठी नागरिकांना सतत रस्ता ओलांडावा लागतो. यासाठी रामवाडी गावठाणाच्या मुख्य प्रवेशद्वार समोर मेट्रो पिलर क्रमांक ४१७ व ४१८ मधून पादचारी मार्गाचा वापर केला जातो. परंतु, पुणे महामेट्रोने एका जाहिरात कंपनीला सर्व मेट्रो खांब भाडे तत्वावर दिले आहेत. कंपनीने आपले फलक प्रकाशित करण्यासाठी रामवाडीमधील मेट्रो खांब क्रमांक ४१७ व ४१८ मधून पादचारी नागरिक ज्या ठिकाणी पाय ठेवून वर चढतात त्याच ठिकाणी जाहिरात कंपनीने धोकादायक पध्दतीने वीज वाहिनी टाकली आहे.
रस्ता ओलांडताना ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी किंवा विद्यार्थी-विद्यार्थिंनींचा केबलवर पाय अडकवून किंवा पाय घसरुन अपघात होवू शकतो. तसेच पादचारी मार्गातील धोकादायक विद्युत केबलमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रामवाडीतील मेट्रो खांब क्रमांक ४१७ व ४१८ मधील पादचारी मार्गातील धोकादायक विद्युत केबल काढून ती भूमिगत करावी, अशी मागणी केली आहे.
नगर रस्त्यावर मेट्रोने रामवाडी मधील पादचारी मार्गात विद्युत केबल टाकण्यात आली आहे. शहरात केबल उघड्यावर न टाकता भूमिगत केल्या जात आहे. मात्र, मेट्रोने ह्या केबल उघड्यावर टाकून नागरिकांचा जीव धोक्यात घातला आहेत. याबाबतची तक्रार पुमे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे केली आहे.
- प्रमोद देवकर-पाटील, सामाजिक कार्यकर्ते.
Related
Articles
बंगळुरू-काठमांडू विमानसेवा आजपासून
01 Jun 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
भाषण स्वातंत्र्य म्हणजे समाजाच्या भावना दुखवणे नव्हे
04 Jun 2025
अब्बास अन्सारी याला दोन वर्षांची शिक्षा
01 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
बंगळुरू-काठमांडू विमानसेवा आजपासून
01 Jun 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
भाषण स्वातंत्र्य म्हणजे समाजाच्या भावना दुखवणे नव्हे
04 Jun 2025
अब्बास अन्सारी याला दोन वर्षांची शिक्षा
01 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
बंगळुरू-काठमांडू विमानसेवा आजपासून
01 Jun 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
भाषण स्वातंत्र्य म्हणजे समाजाच्या भावना दुखवणे नव्हे
04 Jun 2025
अब्बास अन्सारी याला दोन वर्षांची शिक्षा
01 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
बंगळुरू-काठमांडू विमानसेवा आजपासून
01 Jun 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
भाषण स्वातंत्र्य म्हणजे समाजाच्या भावना दुखवणे नव्हे
04 Jun 2025
अब्बास अन्सारी याला दोन वर्षांची शिक्षा
01 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
चेरीचा हंगाम बहरला
4
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
5
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
6
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल